Saturday 5 January 2019

Personality व्यक्तीमत्त्व

पर्सनालीटी डेवलपमेंट personality

       व्यक्तीला आपलं एक व्यक्तीमत्त्व असतंच परंतू जगा सोबत, आधुनिकतेकडे आणि प्रगल्भतेकडे जाणारे व माणुसकी वा जीवनावश्यकतेकडे नेणारे असे व्यक्तीमत्त्व माणसाला हवे असते.आणि ते साधारणतः आपोआप मिळतेही परंतू बरेचदा व काही किंवा भरपूर जनमाणसं या गोष्टी पासून अलिप्त असतात आणि राहतात ते आपली वागणूक, विचार व अनुभव व परिस्थितीशी जुळवून परिणाम कारकता साधू शकत नाही. या मागे अनेक कारणे असू शकतात.
शेवटी काय तर आपण याच गोष्टी बद्दल समजावून घेण्याचा पूर्ण करणार आहोत.
निव्वळ स्वच्छ, टापटीप कपडे परिधान करून वा नव्या फॅशन्स अवलंबून व्यक्तीमत्त्वाचा दिखावा होवू शकतो परंतू याला व्यक्तीमत्त्व म्हनता येत नाही.
व्यक्तीमत्त्व एक छाप असते जी आपल्या मध्ये अंतर्बाह्य गुन आणि वागणूक तसेच अवगुणांचा साठा प्रगल्भ ठेवून असते.
स्वतःच व्यक्तीमत्त्व साकारनं म्हणजे स्वतः मध्ये अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणावं लागणार असतं.
1.सकारात्मकता
हा एक गुन आहे जो प्रत्येक गोष्टीला स्वच्छतेने आत्मविश्वासाने पहायला शिकवतो,तसेच अडचणी वर मात करायला शिकवतो जगाशी स्वतःचं नातं बनवण्याची व टिकवण्याची शक्ती या सकारात्मक तेमधून मिळतेही.
सकारात्मकता म्हणजे होकार,पाॅझेटीव थिंकींग असतं.कूठल्याही विचारात होकारार्थी पणा आशावादी पणा आणनं,कुठलाही व्यवहार असो,विचार असो तो आपन पाॅझेटीव थिंकींग न करायचा असतो.सकारात्मकता म्हणजे नक्की काय तर नकारात्मक विचार आणि विषयांवर मात करणं होय.

No comments:

Post a Comment