Sunday 27 January 2019

साई भक्त

साईंच्या भक्ताची शंका

      साईंचं दर्शन त्यावेळीही दररोज शेकडो लोकं मिळवतं,कोणी आपल्या व्यथा सांगे,कोणी आपलं आराध्य दैवत साई बाबांमध्ये पाहात व दर्शन घेत,तर काही साईंना परमेश्वर वा गुरू समजून नित्य वा अधून मधून दर्शन मिळवत.

       एकदा असे झाले की, भक्त श्री.नरके प्रोफेसर हे साईंच्या दर्शनास बाहेर गावा वरून शिर्डी स आले .बाबांचं दर्शन ,आरती करून ते बाकी तिथं थांबलेल्या भक्तांबरोबर गप्पा करित असता समोर एक स्री बाहेर ऊभी आहे हे पाहाताच साई बाबा एकाएकी शीव्या देवू लागले,त्यांचा क्रोध न आवरण्या इतवर गेला .हे बघून तर नरके प्रोफेसर विचारातच पडले परंतू काहीही न बोलता शिर्डीहून परतल्यावर ही एक गोष्ट त्यांच्या मनाला टोचली गेली.

        नरके प्रोफेसर हे धार्मिक व साधू संगतीची आवड असलेले होते पूढे काही महीण्यांनी त्यांची भेट सिद्ध व संत असे श्री.माळी महाराज यांच्याशी झाली व चर्चा करत असता नरके प्रोफेसरांनी साई बाबां विषयी मनात बाळगलेली शंका समाधान करवून घेण्याकरिता विचारली असता माळी महाराजांनी त्या स्री बद्दल माहीती काढून तीच्या गावी जावे व प्रत्यक्ष साईंचा चमत्कार पहाण्यास सांगितलं.माळी महाराजांचं दर्शन घेवून काही काळानंतर नरके प्रोफेसर त्या स्त्री बद्दल माहिती काढून तीच्या गावी गेले व तीथे गेल्या नंतर त्यांना समजले की ,त्या स्त्रीला पूर्वी मूलबाळ नव्हतं व साईबाबांचा महीमा ऐकून ती साईंना साकडं घालण्या करिता गेली होती .
      साईंनी तीला पहाताच तीच्या मनातली गोष्ट ओळखली व तीला अडसर होणार्या गोष्टींना उद्देशून त्यांनी शीव्या दिल्या व परिणाम म्हणजे त्या नंतर तीला मूल झालं.तीचं मनोरत साईंनी पूर्ण केलं.
        हे समजल्यावर नरके प्रोफेसरांचे मन समाधान पावले़ व आपले साईं हे कीती उच्च कोटीचे आहे हे लक्षात आले.

No comments:

Post a Comment