Monday 19 November 2018

साई बाबा आणि चरित्र

    नमो साई

साईबाबा आणि चरित्र 

  साईचरित्र पाहीलं तर कुठंही
 असं दिसत नाही ,की साई बाबांनी आपलं साधूत्त्व किंवा चमत्कारांनी लोकं जमवली,साईंनी खुप चमत्कार केले ही, परंतू ते आपल्या भक्तांना व चांगल्या लोकांना दृष्टांत दाखवण्याकरिता वा संकटं नाहीसे करण्याकरिताच.लोकं आपल्याला काय समजतात याचीही तमा साईंनी केली नाही हे त्यांच्या वेशभूषे वरूनच दिसून येते.त्यांची वेशभूषा म्हणजे साधी ,काही वेळेस फाटलेली सुद्धा,एक टमरेल आणि त्यांची चिलीम.
   साईंकडे खूप सिद्धी होती,त्यांनी भक्त दासगणू यांना तीर्थाचं स्नान करवलं तेही तळहाताच्या अंगठ्यांनी ,तेल देण्यास नकार देणार्या दुकानदारांना त्यांनी तेला ऐवजी पाण्यानं  दिवे पेटवून दाखवले,धूणी ची ऊदी देवून त्यांनी अनेकांची दूखं नाहीसे केले.
   परंतू स्वतः साठी कधीही चैनीच्या बाबी वापरल्या नाही.